Welcome to NAV LAKSH PRBHA   Click to listen highlighted text! Welcome to NAV LAKSH PRBHA
देशमहाराष्ट्र

अजित दादांचे निधन, राज्यात शासकीय दु:खवटा; पण सब जेलरच्या ‘बर्थ डे’चं कार्यालयातच सेलिब्रेशन; तहसिलदारांकडून दखल

अजित दादांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असताना, शासनाने 28 ते 30 जानेवारी या तीन दिवसांसाठी शासकीय दुखवटा जाहीर केला होता.

सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. या निधनानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते. तर, राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांनी आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी आपले दौरे रद्द करत शासकीय दुखवटा जाहीर केला. मात्र, राज्यात तीन दिवस शासकीय दु:खवटा असतानाच राज्यातील बार्शी (Solapur) तहसिल कार्यालयातील सब जेलरच्या संवेदनाहीन कृत्याने प्रशासनाची मान शरमेने खाली गेली आहे. कारण, अजित दादांच्या अंत्यविधीदिवशीच बार्शीत तहसील कार्यालयातील सब जेल विभागातच केक कापून सब जेलरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनचे फोटोही समोर आले आहेत. याबाबत, आता तहसिलदारांनी नोटीस पाठवून खुलासा मागवू घेणार असल्याचे म्हटले.

अजित दादांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असताना, शासनाने 28 ते 30 जानेवारी या तीन दिवसांसाठी शासकीय दुखवटा जाहीर केला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकांसाठीच्या आपल्या सर्व सभा रद्द करत संवेदना जपली. तर, राज्यभरातील कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारीही या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. मात्र, याच शोककाळात बार्शी तहसील कार्यालयात घडलेल्या एका प्रकाराने प्रशासनाची संवेदनशून्यता आणि शिस्तहीनता उघडकीस आली आहे. प्रशासनाला कडक शिस्त लावणाऱ्या आणि  पकड मजबूत असल्याने ज्या अजित दादांचं नाव घेतलं जातं, त्याच प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी अजित दादांच्या अंत्यविधीदिवशीच शासकीय कार्यालयात केक कापून, गळ्यात पुष्पहार घालून हॅप्पी बर्थ डे साजरा केला. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयात अशाप्रकारे कुठलाही वैयक्तिक थाट, वाढदिवस साजरा करण्यास गृहविभागानेच मनाई केली आहे. मात्र, शासनानेच नियम शासकीय कर्मचाऱ्याने धाब्यावर बसवल्याने संबंधितावर काय कारवाई होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बार्शी तहसील कार्यालयाच्या आवारात 29 जानेवारी सब जेल विभागाच्या कार्यालयात व तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल सहाय्यक व बार्शी तहसील कार्यालयाचे जेलर (सब-जेल विभाग) संदीप नालपे यांनी आपला वाढदिवस साजरा करून प्रशासकीय शिस्तीची लाज काढली. याप्रकरणी, बार्शी तहसीलदार एफ.आर. शेख यांनी संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस काढून कारवाई करणार असल्याचे म्हटले.

नोटीस काढून खुलासा मागविणार

तहसील सहाय्यक व जेलर संदीप नालपे यांचे शासकीय दुखवटा काळातील वाढदिवस साजरा करण्याचे फोटो आम्हाला मिळाले आहेत. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस काढून खुलासा मागविणार आहेत. तसेच, घटनेचे गांभीर्य ओळखून, तथ्य आढळल्यानंतर शासकीय नियमाच्या उल्लंघन प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही तहसिलदार शेख यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!